दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!

दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!

अहमदनगर (प्रतिनिधी)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danave) यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले (shivaji kardile) यांच्याकडे आयोजित विवाह सोहळ्यातील मेहंदी कार्यक्रमात (Mehndi program) हातावर कमळाची मेहंदी काढून घेतली.

दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!
VIDEO | काँग्रेस स्थापना दिवस : ध्वजारोहण कार्यक्रमावेळी घडले असे काही, सोनिया गांधीही बघत राहिल्या

केंद्रीय मंत्र्यांनी कर्डिलेंच्या डोळ्यांदेखत हातावर कमळ रंगवून काय संदेश दिला असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय (akshay kardile) यांचा विवाह होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट दिली.

दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना मंत्री दानवे यांना हातावर मेहंदी काढण्याचा मोह झाला. त्यांनी मेहंदी कलावंताला आपल्या हातावर भाजप पक्षाच्या कमळाची मेहंदी काढण्याचा सल्ला दिला आणि तसे झालेही.

यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खा. सुजय विखे, उद्योजक राजेंद्र चोपडा, अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक मनोज कोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, अजय चितळे आदी उपस्थित होते. दानवेंनी कर्डिलेंच्या सोहळ्यात हातावर कमळाची मेहंदी काढून काय संदेश दिला असेल याची चर्चा सुरू आहे.

दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?
दानवेंच्या हातावर कर्डिलेंची मेहंदी!
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com