भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राहाता तहसीलवर आंदोलन

भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने राहाता तहसीलवर आंदोलन

राहाता |वार्ताहर| Rahata

ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने राहाता तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन आंदोलन करण्यात आले.

भाजपचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नंदकुमार जेजुरकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन कापसे व जिल्हा सरचिटणीस सुनील लोंढे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. आघाडी सरकारने वेळीच इम्पेरिकल डेटा दिला असता तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती.

जाणूनबुजून या सरकारला ओबीसी आरक्षण काढून घ्यायचे होते म्हणूनच कोर्टाला इम्पीरिकल डेटा त्यांनी दिला नाही. ओबीसी समाजाला निवडणुकांपासून बाजूला ठेवले म्हणूनच या सरकारचा ओबीसी समाजाच्यावतीने व भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत.

यावेळी भाजपाचे नितीन कापसे, नंदकुमार जेजूरकर, सुनील लोंढे, साहेबराव निधाने, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे आदींनी मनोगत व्यक्त केले. या निवेदनावर युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कापसे, अनिल बोठे, ज्ञानेश्वर गाडेकर, ज्ञानेश्वर दाभाडे, राजेंद्र वाबळे, अंकुश निमसे, राहुल बावके आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com