भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी दळवी यांची निवड

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले पत्र
भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्षपदी दळवी यांची निवड

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

महाराष्ट्र राज्य भाजपा ओबीसी आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कर्जत येथील विनोद दळवी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते देण्यात आले.

कर्जत इथे भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख असलेले विनोद दळवी यांची भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर यांनी श्री. दळवी यांची निवड करत असल्याचे पत्र दिले आहे. श्री. दळवी यांच्या निवडीचे पत्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आले असून राज्यामध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचे संघटन वाढवावे तसेच ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना भाजपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावा असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

दळवी यांच्या निवडीबद्दल माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार योगेश टिळेकर, सरपंच काकासाहेब धांडे, काकासाहेब ढेरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.सुनील गावडे, भाजपचे कर्जत शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, अनिल गदादे यांंनी अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.