
पारनेर (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात राष्ट्रवादी शिवसेनेला संपवण्याचे काम करत असून राज्यसभा निवडणुकीच्या निकालामध्ये त्याचा प्रत्यय आला आहे. शिवसेनेचा मला खासदार करण्यामध्ये 50 टक्के वाटा असून....
मी खऱ्या शिवसैनिकाला कधीही वार्यावर सोडणार नाही. यामुळे भले माझ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई केली तरी चालेल. असे बोलण्याची हिंमत ठेवणारा मी भाजपचा एकमेव खासदार आहे. असे वक्तव्य खा. डॉ. विखे पाटील यांनी येथे केले.
पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते. पुढे बोलताना डॉ. विखे म्हणाले, गेल्या तीन वर्षांच्या काळात मी कधीही शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी वेळीच सावध व्हावे.
पारनेर तालुका हा चुकीच्या लोकांच्या हातात असून तालुक्यातील वैचारिक संस्कृती मोडीत काढण्याचा याठिकाणी प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारी वृत्तीला या तालुक्यात खतपाणी घातले जात आहे. हा वैचारिक तालुका वेगळा वळणावर जात आहे. मी येथील राजकारण ओळखतो. येथे विचारांचा वारसा आहे. तो वारसा टिकविण्यासाठी असे निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवसेनेने येथे घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असेल.
यावेळी पारनेर तालुक्याचे माजी आमदार विजयराव औटी, सभापती गणेश शेळके, युवा नेते सचिन वराळ, विश्वनाथ कोरडे, वसंत चेडे, ऍड. बाबासाहेब खिलारी, बाळासाहेब माळी, शंकर नगरे, प्रियंका शिंदे, अश्विनी थोरात, योगेश रोकडे, दीपक पवार, सागर मैड, मोहन रोकडे, बंडू रोहोकले, अभिजीत शिंदे, निलेश खोडदे, किरण कोकाटे, कैलास कोठावळे, मनोज मुंगसे, लहू भालेकर, प्रीती साबळे, डॉ. अजय येणार, शरद सरोदे, बंटी साबळे, बाबा जवक, विनोद जवक, भिमाजी शिंदे, रामभाऊ मांडगे, ज्ञानेश्वर वरखडे, निलेश घोडे, मधुकर पठारे, विश्वनाथ झिंजाड, प्रकाश इघे आदी यावेळी उपस्थित होते.