बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील, खासदार विखेंचा घणाघात

बॅलन्स सीट जुळल्यानंतर पालकमंत्री जिल्ह्यात येतील, खासदार विखेंचा घणाघात

अहमदनगर | Ahmednagar

'पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) हे त्यांचे बॅलन्स शीट चेक करत आहेत. ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत. नेमके किती पैसे आले आणि किती पैसे गेले, याचा ते शोध घेत आहेत. ते एकदा सापडल्यानंतर पालकमंत्री नगर जिल्ह्यात येतील,' असा घणाघात खासदार डॉ. सुजय विखे (mp dr sujay vikhe) यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला.

भाजपचे (bjp) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप केला आहे. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे नगर जिल्ह्यामध्ये केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याभागात ही हसन मुश्रीफ यांनी अद्याप भेट दिली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना आज खासदार विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.

ते म्हणाले, 'मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या. अकाउंट बुक चेक करू द्या. नेमके किती पैसे आले, किती गेले हे एकदा कळू द्या. त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील,' टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड आदी सहभागी झाले होते. यावेळी भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघडीवर जोरदार टीका केली.

Related Stories

No stories found.