आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा - आ. विखे

आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला आमचा पाठिंबा - आ. विखे

शेवगाव | तालुका प्रतिनिधी

आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाज जी भूमिका घेईल त्याला पक्षीय भूमिका आड येवू न देता आमचा पाठिंबा असेल अशी ग्वाही भाजपाचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजातील संघटनाच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना दिली.

आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा आंदोलनातील सहभागी संघटनांच्या प्रतिनिधीशी तसेच समाजीतील सर्वच घटकांशी संवाद साधण्यात येत आहे. आ.विखे पाटील यांच्याकडे नगर आणि नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याने आ.विखे पाटील यांनी शेवगाव पासून या दौऱ्याला प्रारंभ केला. शेवगाव येथील लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले तसेच आ.मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजमाता अहील्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिना निमित त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आ.विखे यांनी राजस्व मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मराठा समाजातील प्रतिनिधीशी संवाद साधला.

प्रारंभी आ.विखे यांनी या संवाद साधण्यामागची भूमिका विषद केली. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निकालानंतर मराठा समाजात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आघाडी सरकार अद्याप ठोस आशी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. त्यामुळेच आरक्षणाच्या मागणीसाठी पुढे काय करता येईल हे जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी बापुसाहेब गवळी प्रा.शिवाजीराव देवढे यांच्यासह अन्य प्रतिनिधीनी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आपली मत जाणून मांडताना आरक्षणाच्या बाबतीत न्याय मिळत नसल्याने एक पिढी बरबाद होत असल्याकडे लक्ष वेधतानाच, नोकरीच्या बाबतही मोठ्या गंभीर समस्या निर्माण झाल्याचे सांगितले. आ.मोनिका राजळे यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून या आंदोलनात आम्ही तुमच्या समवेत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.

आ.विखे पाटील यांनी बैठकीचा समारोप करताना पक्षीय पातळीवर मराठा आरक्षणाच्या संदर्भात कायदेशीर लढाई करण्याबाबत विचार सुरू आहेच.परंतू उद्या रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ आल्यास पक्षीय भूमिका बाजूला ठेवून आम्ही समाजा सोबत आहोत.तुम्ही फक्त हाक द्या आशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोंढे, चंद्रकांत गरड, बापुसाहेब पाटेकर, अमोल सागडे, नगरसेवक सागर फडके, अॅड.विजय कापरे आदीसह युवक, महिला या बैठकीस उपस्थित होत्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com