...म्हणून शिवसेना सोडू नका; दरेकरांचा संजय राऊतांना खोचक टोला

...म्हणून शिवसेना सोडू नका; दरेकरांचा संजय राऊतांना खोचक टोला

शिर्डी | शहर प्रतिनिधी

संजय राऊत म्हणतात मी शिवसेना सोडणार नाही, तुम्हाला कोण म्हणतय शिवसेना सोडा, त्यांना माझी विनंती आहे की आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना संपेल. त्याच्यामुळे आपण शिवसेना सोडू नये अशी खोचक टीका विधानपरिषदेचे आ.प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली आहे.

दरम्यान भाजपचे विधानपरिषदेचे मा.विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी रविवार दि.31 जुलै रोजी साईदरबारी हजेरी लावून श्री साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मा.विश्वस्त सचिन तांबे, भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, सुधीर शिंदे, उपाध्यक्ष सुधीर शिंदे, भाजयुमोचे शहराध्यक्ष योगेश गोंदकर, लखन बेलदार, नरेश सुराणा आदी मान्यवरांसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आ.दरेकर यांना प्रसारमाध्यमांनी खा.संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, संजय राऊत म्हणतात मी शिवसेना सोडणार नाही, तुम्हाला कोण म्हणतय शिवसेना सोडा, त्यांना माझी विनंती आहे की आपण जेवढे दिवस शिवसेनेत राहाल तेवढे लवकर शिवसेना संपेल. त्याच्यामुळे आपण शिवसेना सोडू नये, आणी तुम्ही शिवसेना सोडली तर तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाही आणी शिंदे गटात देखील नसल्याचे विधान त्यांनी केले. संजय राऊत यांच्यावर सुरू असलेल्या ईडी चौकशी दरम्यान त्यांनी गँलरीत येऊन वर हात दाखवण्याचा मोह ते थांबवू शकत नाहीत. म्हणजे एवढे प्रसिद्धी लोलू याठिकाणी झालेले आहे. कि काय होतो आणी आपण काय करतोय याचे भान देखील राऊतांना राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचा विषय मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला होता. कोर्टात टिकला होता मात्र या लोकांच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आरक्षण गेले असून शंभर टक्के मराठा समाजाच्या सर्व प्रश्नांंसंदर्भात आमचे सरकार सकारात्मक असून मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री हे दोघेही यातून लवकरच मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com