तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे

तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे

लोणी |प्रतिनिधी| Loni

केंद्र सरकारच्या 78 योजनांचा (78 schemes of Central Government) लाभ समाजातील विविध घटकांना मिळाला आहे. प्रत्येक लाभार्थ्याशी संवाद साधून मन की बात करा, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे (PM Narendra Modi) ही योजना आपल्यापर्यंत आल्याचे घरोघरी जावून सांगा. या सरकारच्या मर्मावर बोट ठेवून तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या, असे आवाहन आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना (BJP Worker) केले.

तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे
‘माझी वसुंधरा अभियानात’ पाच ग्रामपंचायती अव्वल

भारतीय जनता पार्टीच्या उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (Rajendra Gondakar) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत आ. विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाच्या पार्श्वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमाचा आढावा घेतला. या बैठकीस माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आ. वैभव पिचड, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ बोठे, नितीन कापसे, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनिल वाणी, नंदकुमार जेजुरकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, किसान आघाडीचे सतिष कानवडे, अल्पसंख्याक आघाडीचे आसिफ पठाण, भटके विमुक्त आघाडीचे विठ्ठल राऊत, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, वैद्यकीय आघाडीचे डॉ. महेंद्र कोल्हे, व्यापारी आघाडीचे शिरीष मुळे यांच्यासह सर्व तालुका आणि शहर अध्यक्ष याप्रसंगी उपस्थित होते.

आ.विखे पाटील म्हणाले की, सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व हा पंधरा दिवसांचा कार्यक्रम खर्‍या अर्थाने केंद्र सरकारच्या योजनांचा जागर करण्याचा कार्यकाळ आहे. पंतप्रधान मोदींनी समाजातील सर्वच घटकांना डोळ्यासमोर ठेवून योजनांची केवळ घोषणाच केली नाही तर प्रभावी अंमलबजावणी केली. समाजातील प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या योजनेचा लाभार्थी ठरला आहे. या लाभार्थ्यांशीच आता तुम्हाला संवाद करायचा आहे. दर महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याशी मन की बात करतात अशाच प्रकारची मन की बात आता लाभार्थ्यांशी जावून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करायची असल्याचे त्यांनी सुचित केले.

तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे
मशागती पूर्ण करुन शेतकरी करताहेत पावसाची प्रतिक्षा

केंद्र सरकारमुळे आज कृषि उत्पादीत मालाला मोठ्या प्रमाणात भाव मिळू लागला आहे. आज कापूस 14 हजार रुपये क्विटलने तर सोयाबीन 12 हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. प्रथमच एवढा भाव कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मिळाला. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे मोदींचे उदिष्ठ हे या माध्यमातूनच सिध्द होत असल्याचे सांगून केंद्र सरकारमुळेच या देशातील शेतकर्‍याला मोठा आधार मिळाला आहे. दुसरीकडे मात्र राज्यातील आघाडी सरकार कोणतीही मदत करु शकलेले नाही. आघाडी सरकारचे हे अपयश जनतेसमोर जावून मांडण्याची संधी या पर्वाच्या निमित्ताने तुम्हाला मिळणार आहे.

तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे
वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे

कोविड काळात मंत्र्याच्या तालुक्यातही नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. मृत्यूची आकडेवारी लपविली गेली. राज्य सरकारने लस देण्यामध्येही फसवणूक केली. धान्याची उपलब्धता केंद्राने करुन दिली. त्याचे श्रेयही महाविकास आघाडी सरकार घेत आहे. हीच बाब तुम्हाला आता नागरिकांच्या लक्षात आणून द्यायची आहे. याकरिता प्रत्येक तालुक्यात केंद्र सरकारने मदत आणि योजनांच्या रुपाने दिलेला निधी व महाविकास आघाडीमुळे जनतेचे झालेले हाल पुस्तिकेच्या रुपाने समोर आणा, असे आवाहनही त्यांनी केले.

तीन पक्षांनी केलेली फसवणूक जनतेला पटवून द्या - आ. विखे
आमच्या दारात धरण बांधून आमचे मरण कांडू नका

माजी आ. वैभव पिचड म्हणाले की, कोणत्याही गरीब माणसाला मिळालेल्या योजनेचा लाभ तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. हीच आठवण आता भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करुन द्यायची आहे. केंद्र सरकार आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन करुन आघाडी सरकारमुळे आदिवासी, दूध उत्पादक शेतकरी यांची घोर फसवणूक झाली आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य मिळू नये म्हणून प्रयत्न सुरु झाले आहेत. वाहतुकदारांचा पगार केला नसल्यामुळे धान्य मिळण्यात अडचण निर्माण होत असल्याची बाब त्यांनी बैठकीत उपस्थित केली.

माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी मागील पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केलेले काम आणि या आघाडी सरकारचे अपयश याची तुलनात्मक मांडणी लोकांमध्ये जावून तुम्हाला करायची आहे. यासाठी योजनांची माहिती ही खुप मोठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आगामी पंधरा दिवसात भाजपाच्या सर्व आघाड्यांच्या वतीने तालुका निहाय कार्यक्रमाचे नियोजन करुन हे गरीब कल्याणपर्व यशस्वी करण्याचे आवाहन केले. संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांनी सर्व आघाड्यांच्या जिल्हाध्यक्षांकडून कार्यक्रमाचा आढावा घेतला. सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाची माहिती जालिंदर वाकचौरे यांनी दिली. पदाधिकार्‍यांनी बैठकीत महत्वपूर्ण सूचना केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com