अकोले l प्रतिनीधी

कृषीपंपांना आणि घरगुती ग्राहकांना आलेली वाढीव वीजबीले तात्काळ रद्द करावीत म्हणून भाजपाचे अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री आणि माजी आमदार

वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली अकोले वीजवितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला भाजपाकडून टाळे ठोकण्यात आले. यावेळी राज्यसरकार व वीजवितरण कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात भाजपाचे जि.प.सदस्य व गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्ह्याध्यक्षा सोनाली नाईकवाडी, जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, राहूल देशमुख,अरुण शेळके, पं.स.सदस्या माधवी जगधने, धुमाळवाडीच्या माजी सरपंच चंद्रकला धुमाळ यांचे सहित तालुक्यातील भाजपाचे नेते-कार्यकर्ते सहभागी होते.

वीजवितरणचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश बागुल,राजुरचे उपकार्यकारी अभियंता विवेक मवाडे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.