'मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले'

कोल्हार भगवतीपूर येथे शंखनाद आंदोलन
'मुख्‍यमंत्री स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले'

कोल्‍हार (वार्ताहर)

मुख्‍यमंत्री (CM Uddhav Thackeray) स्‍वत: घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले. अजून किती दिवस कायद्याचा धाक दाखवून तुम्‍ही भाविकांना वेठीस धरणार असा सवाल भाजपा (BJP) नेते आ.राधाकृष्‍ण विखे (MLA Radhakrish Vikhe) पाटील यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) आम्‍हाला रस्‍त्‍यावर येण्‍यास भाग पाडणार असेल तर कोणतीही लढाई करण्‍याची आमची तयारी आहे. मंदिरांसाठी आता यापुढची लढाई आम्‍हाला न्‍यायालयातच करावी लागेल असा इशाराही त्‍यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्‍या अध्‍यात्‍म‍िक आघाडीच्‍या वतीने राज्‍यातील मंदिर सुरु करावीत म्‍हणून आंदोलनं करण्‍यात आली. अध्‍यात्मिक आघाडीच्‍या वतीने श्रीक्षेत्र कोल्‍हार भगवतीपूर येथील भगवतीमाता मंदिराच्‍या प्रांगणात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शंखनाद आंदोलनात आ.विखे पाटील सहभागी झाले.

शासनाच्‍या नाकर्तेपणावर त्‍यांनी सडकून टिका करताना भाविक, वारकरी आणि अध्‍या‍त्‍म क्षेत्रातील व्‍यक्तिंच्‍या भावनांशी तुम्‍ही खेळू नका, यापूर्वी पंढरपूरच्‍या वारीवर बंधन घालून तुम्‍ही वारक-यांचा अपमान केलेलाच आहे आता अधिक अंत पाहू नका अन्‍यथा या भावनांचा उद्रेक होईल अशा शब्‍दात त्‍यांनी सरकारला खडेबोल सुनावले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com