आघाडीचा रिमोट कंट्रोल दुसर्‍याच्या हातात गेल्याने मुख्यमंत्री हतबल- आ. विखे

आघाडीचा रिमोट कंट्रोल दुसर्‍याच्या हातात गेल्याने मुख्यमंत्री हतबल- आ. विखे
आ. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी |वार्ताहर| Loni

आयकर विभागाने (Income Tax Department) 1 हजार 50 कोटी रुपयांच्या समोर आणलेल्या घोटाळ्यात राज्यासह जिल्ह्यातील कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले हे लवकरच समोर येईल, असे सूचक विधान भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (BJP leader MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी करून महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारचा रिमोट कंट्रोलही आता दुसर्‍यांच्या ताब्यात गेल्याने मुख्यमंत्री (CM) हतबल झाल्याची घणाघाती टीका (Criticism) त्यांनी केली.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Co-operative Sugar Factories) बॉयलर अग्निप्रदीपन सोहळ्यानंतर आ. विखे पाटील (BJP leader MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. सत्तेवर आल्यापासूनच महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकत चालले आहे. या घोटाळ्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करून केवळ दिशाभूल करण्याचे काम मंत्र्यांकडून सुरू असून कालचा महाविकास आघाडीचा बंद हा त्याचसाठी होता. परंतु राज्यातील सुज्ञ जनतेने या महाराष्ट्र बंदला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा दावा त्यांनी केला.

मागील आठवड्यात आयकर विभागाने (Income Tax Department) समोर आणलेल्या घोटाळ्यात अधिकारी, दलाल आणि काही मंत्र्यांची नावे असल्याची आपली माहिती आहे. त्यामुळे या घोटाळ्यात कोणाला लक्ष्मी प्रसन्न झाली आणि कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले हे समोर येईलच. परंतु हे रॅकेट उघड झाल्यास जिल्ह्यातील काहींची नावे पुढे आली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची (Corruption) मालिकाच समोर आली आहे. राज्याच्या इतिहासात गृहमंत्री (Home Minister) फरार झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. यावरूनच या सरकारचा कारभार जनतेच्या हिताचा आता राहीला नसल्याची टिका आ. विखे पाटील (Criticism BJP leader MLA Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेचे समर्थन नाहीच परंतु या घटनेतील वास्तविकता चौकशीतून समोर येईलच. या घटनेचे भांडवल करुन महाराष्ट्र बंद करण्याचा महाविकास आघाडीचा खटाटोप हा नाकर्तेपणा दाखविणारा ठरला आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषि कायदे संसदेत मंजुर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक मात्र त्यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत, शिवसेनेच्या खासदारांनी (Shivsena MP) सोईनुसार गप्प बसण्याची भूमिका घेतली. आता फक्त राजकारणासाठी आपली पोळी भाजून घेण्याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न जनतेच्याही लक्षात आले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com