वीरगाव(वार्ताहर)

अकोले तालुक्यात सर्वाधिक चुरशीने झालेल्या वीरगाव ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडविला.

निवडणूक निकालात भाजपला 7 तर आघाडीला 3 जागा मिळाल्या. यापुर्वीच प्रभाग क्र.1 मधून अविरोध निवडून आलेल्या एकनाथ भरत मेंगाळ यांचेमुळे भाजपाची सदस्यसंख्या 8 झाली आहे.

भाजपाचे जि.प.सदस्य आणि गटनेते जालिंदर वाकचौरे आणि अमृतसागर दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांचे नेतृत्वाखालील भाजपच्या उमेदवारांनी शिवसेनेचे बाळासाहेब कुमकर, राष्ट्रवादीचे भागवत कुमकर यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत करुन वीरगाव ग्रामपंचायतवर भाजपचा एकहाती झेंडा रोवला. 11 जागा असलेल्या वीरगाव ग्रामपंचायतमध्ये भाजप 8 आणि महाविकास आघाडी 3 असे पक्षीय बलाबल झाले आहे.