श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष

गणेश राठी व शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी केली आहे. यासदंर्भात प्रातिनिधीक स्वरूपात स्टेशन प्रबंधक ए. के. यादव यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी सदर निवेदन रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

श्री. यादव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर जिल्ह्यातील सर्व प्रवाशांना फायदा व्हावा म्हणून साईनगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची गरज असून त्याचा लाभ कोपगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या तालुक्यांतील प्रवाशांना होणार आहे. सकाळी सहा वाजता शिर्डीहून तर परतीचा प्रवास सायंकाळी सहा वाजता सोडण्याचे नियोजन करावे,अशी मागणी राठी व बिंगले यांनी केली आहे. या रेल्वेमुळे व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय दूर होणार आहे.

निवेदन देताना मिलिंदकुमार साळवे, विजय नगरकर आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री ना. पियुष गोयल, विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, उत्तर नगर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर आदींना पाठविण्यात आल्या असून याप्रकरणात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याकामी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.