भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात गुन्हा

हॉटेलमध्ये दोन गटांत राडा: परस्परविरोधी फिर्यादी
भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हॉटेल चालकाला मारहाण केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मनोज दुल्लमसह सहा जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुल्लम गटानेही पोलिसांत फिर्याद दिली आहे. रविवारी रात्री दोन गटामध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

पाईपलाईन रोडवरील रूचिरा हॉटेलचे चालक रवींद्र विश्वनाथ वाघमारे (वय 46 रा. गुलमोहर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोज दुल्लम, महेश म्याना, दीपक विलास सगम, राकेश व्यंकटेश पासकंठी व दोन अनोळखी इसम (सर्व रा. श्रमिकनगर, सावेडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी हॉटेलमध्ये येत उधार जेवण दिले नाही म्हणून वाघमारे यांना पाणी पिण्याचा जग, काचेचा ग्लास व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहे. दुल्लम गटाचे राजेश व्यकंटेश पासकंठी (वय 33 रा. श्रमिकनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवींद्र वाघमारे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मावस भावाचे हॉटेलचे बिल भरण्याच्या कारणावरून वाघमारे याने काचेची दारूची बाटली माझ्या डोक्यात मारून जखमी केले असल्याचे पासकंठी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल आव्हाड करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com