भाजपने जाळला मविआचा पुतळा

कंत्राटी भरतीचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप
भाजपने जाळला मविआचा पुतळा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर जिल्हा भाजपाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शनिवारी दहन करीत त्या सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडीच कंत्राटी भरतीचे पुरस्कर्ते असल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी यावेळी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे व महाविकास आघाडी सरकारनेच ही योजना राबवली असल्याचे पुरावेच सादर केले आहेत. या पार्श्वभूमीवर कंत्राटी भरतीचे पुरस्कर्ते असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन भाजपने सत्य जनतेसमोर आणले असल्याचे अ‍ॅड. आगरकर यांनी सांगितले. दिल्लीगेट येथे निदर्शने करुन तत्कालीन मविआ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे, प्रिया जानवे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर बोचुघोळ, राजेंद्र एकाडे, नितीन शेलार, महेश नामदे, प्रशांत मुथा, तुषार पोटे, बाबासाहेब सानप, बाळासाहेब भुजबळ, रविंद्र बारस्कर, रामदास आंधळे, अजय चितळे, प्रदीप परदेशी, नरेश चव्हाण, गोपाल सहदेव, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, विशाल नाकाडे, संजय ढोणे, अनिल ढवण, अजय ढोणे, सौ.गीता गिल्डा, श्वेता झोंड, कालिंदी केसकर, मालनताई ढोणे, कुसूम शेलार, लिला आगरवाल, गोकूळ काळे, दत्ता गाडळकर, वसंत राठोड, किशोर कटोरे, रवि बाकलीवाल, आदेश गायकवाड, ज्ञानेश्वर काळे, राहुल जामगांवकर, पंडित वाघमारे, बंटी ढापसे, चिन्मय पंडित आदी सहभागी झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com