चित्रा वाघ यांनी आ. लंकेंचे पुन्हा टोचले कान; ट्विट केला 'तो' फोटो

चित्रा वाघ यांनी आ. लंकेंचे पुन्हा टोचले कान; ट्विट केला 'तो' फोटो

अहमदनगर | प्रतिनिधी

पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा निशाण साधला आहे. ट्विटरवर पोलीस कर्मचाऱ्यांसोबत विमान प्रवासाचा फोटो पोस्ट करत 'एका महिलेला हटवल्याचा आसूरी आनंद दिसतोय चेहऱ्यावर' अशी टीका केली आहे.

तत्कालीन तहसिलदार ज्योती देवरे आणि आमदार लंके यांच्यात वाद निर्माण झाला होता. याचे परिणाम राज्यभर उमटले. देवरे यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. चौकशीअंती देवरे यांची बदली झाली. मात्र देवरे यांची बाजू घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आ.लंके यांच्यावर अनेक आरोप केले होते. प्रकरण शांत झालेले आहे, असे वाटत असताना वाघ यांनी पुन्हा एकदा लंकेंवर निशाणा साधत, या प्रकरणात पिच्छा पुरवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सोमवारी सकाळी वाघ यांनी एक फोटो ट्विट केला आहे. यात आ. लंके आपल्या काही मित्रांसोबत विमान प्रवास करत असल्याचे दिसत आहे. या फोटोत पोलीस निरीक्षक बळप आणि पोलीस कर्मचारी दिवटे असल्याचा दावा वाघ यांनी केला आहे. आमदार या दोन पोलिसांना विमानाने फिरवून आणत आहेत. आमदार एवढी बडदास्त ठेवताय म्हटल्यावर पोलिसांसमोर महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो, जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईला ?, असा सवाल वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांचे ट्विट

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com