ओबीसी, मराठा समाजावर आघाडी सरकारकडून अन्याय

माजी मंत्री बावनकुळे यांचा नगरमध्ये आरोप
ओबीसी, मराठा समाजावर आघाडी सरकारकडून अन्याय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील आघाडी सरकार (Aghadi Government) पूर्णपणे अपयशी सरकार ठरले आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यापेक्षा त्यांच्या अडचणीत ते भर घालत आहे. राज्यातील ओबीसी समाजाचे (OBC Society) राजकीय आरक्षण (Political Reservation) या सरकारने घालवले तर मराठा समाजालाही (Maratha Society) हे सरकार आरक्षण देवू शकले नाही. या दोन्ही समाजावर आघाडी सरकारने मोठा अन्याय केला आहे, असा आरोप (Allegations) भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrasekhar Bavankule) यांनी केला.

भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी नगरला धावती भेट दिली. शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या निवासस्थानी ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिंनदन केले. यावेळी सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक प्रदीप परदेशी, सागर गोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) म्हणाले की, भाजपच्या सर्व पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत या निष्क्रिय सरकार विरोधात आवाज उठवावा. नगरमध्ये भाजपाचे काम चांगले चालू आहे. ओबीसी मोर्च्याच्या प्रदेश उपाध्यक्षपदी किशोर डागवाले यांची नियुक्ती पक्षाल बळकटी देणारी ठरेल.

किशोर डागवाले म्हणाले, ओबीसी समाजाचे नेते व भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (BJP leader Chandrasekhar Bavankule) यांनी केलेला सत्कार उर्जादाई आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काम करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com