बिटकेवाडीत भरवस्तीत अवैध गावठी दारू व्यवसाय

कारवाई करण्याची महिलेची पोलीस अधिक्षकांना विनंती
बिटकेवाडीत भरवस्तीत अवैध गावठी दारू व्यवसाय
File Photo

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील बिटकेवाडी येथे भर वस्तीमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू दुकानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात नीता ज्ञानदेव बिडके यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

नीता बिटके यांनी दिलेल्या तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे की, बिटकेवाडी या ठिकाणी त्या त्यांच्या दोन मुलीच्या समवेत राहतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे करता शेवाया मशीनच्या द्वारे तयार करून देण्याचा व्यवसाय करत आहेत. मात्र शेजारीच सुरू असलेला बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीच्या दुकानामुळे त्यांना सातत्याने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

दारू पिणारे लोक या ठिकाणी गोंधळ घालत असतात. याशिवाय त्यांच्याकडे शेवया बनवण्यासाठी महिला येत असतात त्यांना देखील याचा त्रास होतो. यामुळे नीता बिटके यांनी बेकायदेशीर दारू व्यवसाय बंद करावा अशी तक्रार दिली आहे.

पोलिसांकडे गेल्याने मारहाण

16 जून या दिवशी तक्रारीचा राग मनात धरून सासरे भागुजी बिटके, सासु ठकुबाई बिटके, दिर दादा बिट के यांनी निता बिटके यांना शिवीगाळ करत जबर मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र दारू व्यावसायावर कारवाई झाली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com