बिरेवाडीत विषबाधेने गाय, शेळ्यांचा मृत्यू

बिरेवाडीत विषबाधेने गाय, शेळ्यांचा मृत्यू

साकूर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील शेतकरी लालू नारायण ढेंबरे यांच्या एक दुभती गाय व 3 गाभण शेळ्यांना गवतातून विषबाधा झाल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. त्यामुळे शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साकूरजवळील बिरेवाडी येथील शेंडगे वस्तीवर (दुधाणे मळा) लालू नारायण ढेंबरे हे शेतकरी राहत आहे. त्यांनी जवळपास 10 शेळ्या व 2 गायी पाळल्या आहे.

घराजवळच गोठा असून त्यात त्या बांधून ठेवल्या होत्या. तसेच नेहमीप्रमाणे लालू ढेंबरे हे शेतकरी शेळ्या व गायांना गोठ्यात त्यांच्याच शेतातील गवत टाकत होते. परंतु रविवार दि. 28 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गवत खाल्याने शेळ्या व गायी हंबरडा फोडू लागले होते. मात्र बिबट्या आला की काय यामुळे हंबरडा फोडत असल्याचे ढेंबरे यांच्या घरच्यांना वाटले. परंतु काही तासांतच 3 शेळ्या व एक गायीचा तडफडून मृत्यू झाला.

दरम्यान सोमवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जोंधळे यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गवतातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र या घटनेमुळे लालू ढेंबरे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com