जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ

जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ

साकुर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) साकुर (Sakur) जवळील बिरेवाडी (Birewadi) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची (Grampanchayat Election) रणधुमाळी सुरू आहे. 4 ऑगस्ट रोजी मतदान (Voting) होणार आहे. मात्र निवडणूकीतील उमेदवारांपेक्षा माकडाने (Monkey) धुमाकूळ घालत दहशत (Terror) निर्माण केली आहे. तसेच काही ग्रामस्थांवर हल्ला (Villagers Attack) केल्याचीही घटना घडली आहे.

जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ
ट्रकच्या धडकेने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

माकडाने (Monkey) वार्ड क्रमांक 1 मध्ये 3 व्यक्ती, वार्ड क्रमांक 2 मध्ये 2 व्यक्तींना जखमी (Injured) करत वार्ड क्रमांक 3 मध्ये धूमाकूळ घालत दहशत (Terror) निर्माण केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी माकडाचा वनविभागाने तातडीने (Forest Department) बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मनसेचे प्रकल्प कार्यालय राजूर येथे ठिय्या आंदोलन

बिरेवाडी (Birewadi) येथील परिसरात गेल्या दोन दिवसांपुर्वी एक माकड (Monkey) भटकंती करत आले आहे. मात्र माकडाने (Monkey) धुमाकूळ घालत थेट ग्रामस्थांवर हल्ला (Villagers Attack) करत आहे. सागर आखाडा येथील हौसाबाई नानाभाऊ सागर या महिला रविवार दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शेतात चारा आणण्यासाठी जात असताना झाडावर बसलेल्या माकडाने (Monkey) थेट उडी मारत हल्ला (Attack) केला. हल्ल्यात (Attack) उजव्या हाताला चावा घेत जखमी (Injured) केले.

जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन वेश्या व्यवसायास लावले

त्यानंतर दुसर्‍या दिवशी 1 ऑगस्ट रोजी अंजनीगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत (ZP School) इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत असलेली कढणे वस्तीवरील श्रेया राजेंद्र कढणे (वय 8) या मुलीवर माकडाने थेट शाळा सुरू असताना हल्ला केला. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात घाबरगुंडी उडाली होती. तसेच शाळेजवळच राहत असलेल्या गिता ज्ञानदेव ढेंबरे यांच्यावरही हल्ला करत हाताला चावा घेतला. त्याचबरोबर आप्पाजी गंगाराम ढेंबरे यांनाही चावा घेतला.

जिल्ह्यातील ’या’ गावात माकडाचा धूमाकूळ
एस.टी.पी. प्लांट कृती समितीचे कार्यकर्ते आक्रमक

सदर माकड अचानकपणे कुणाच्याही घरात घुसून हल्ला करत आहे. येणार्‍या जाणार्‍या माणसांवर झेप घेत माकड जखमी करत आहे. माकडाच्या या दहशतीमुळे परिसरात घबराट पसरली आहे. माकड रोज हल्ले करत मानवहानी पोहचवत आहे. माकडाच्या भितीमुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. तरी वनविभागाने तातडीने माकडाचा बंदोबस्त करावा अशी मागणी बिरेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com