बिरेवाडी व मांडवे बुद्रूक ग्रामपंचायतीचा गावगाडा तापला

बिरेवाडी व मांडवे बुद्रूक ग्रामपंचायतीचा गावगाडा तापला

साकूर |वार्ताहर|Sakur

संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणार्‍या बिरेवाडी व मांडवे बुद्रूक या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे.

ग्रामपंचायतीवर दि. 19 ऑगष्ट 2021 पासून प्रशासकीय नेमणूक करण्यात आली होती. गेली दहा महिने बिरेवाडी मांडवे बुद्रूक ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासनाच्या हाती होता परंतू अखेर निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आता ऑगष्ट महिन्यात दोन्ही ग्रामपंचायतीचा कारभार सरपंचांच्या हाती येणार आहे. सुरवातीला बिनविरोध होण्यासाठी गाव पुढारी एकत्र आले परंतू त्यांना बिनविरोध करण्यास अपयश आले. दोन्ही ग्रामपंचायतींचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रिया व माघार घेण्याच्या प्रक्रिया पूर्ण झाल्या असून आता एकास एक उमेदवार देवून उमेदवार कंबर कसून प्रचाराला लागले आहे. दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक दुरंगी होत असून प्रचाराच्या रणधुमाळीत विजय खेचण्यासाठी गाव पुढारी यांचेसह गाव गाढा चांगलाच तापू लागला आहे.

बिरेवाडी ग्रामपंचायतीचे तीन प्रभाग असून एकूण 9 जागेसाठी 19 उमेदवार रिंगणात उतरले आहे. शेतकरी विकास मंडळ व जय बजरंग बली ग्रामविकास मंडळ अशी सरळ लढत होत आहे. मांडवे बुद्रूक ग्रामपंचायतीचे 4 प्रभाग असून एकूण 11 जागा आहे. शेतकरी विकास मंडळ आणि ग्रामविकास मंडळ अशी सरळ लढत होत आहे. प्रचाराची रणधुमाळी चांगलीच शिगेला पोहचली असून उमेदवार आपले नशीब अजमावण्यासाठी मतदारांच्या गाठी भेटीवर भर देत आहे.

सत्ताधारी गटाला हदरा देण्यासाठी विरोधकांनी चांगलीच कंबर कसली आहे तर पठार भाग तसा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे पाठीशी कायम राहिला आहे. तसाच काँगेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जात आहे मात्र या निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com