बिरेवाडी, मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान

बिरेवाडी, मांडवे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत मतदान

साकूर |वार्ताहर| Sakur

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या बिरेवाडी व मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान झाले. बिरेवाडी ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 92.86 टक्के मतदान झाले असून 1818 मतदारांपैकी 1687 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर वॉर्ड क्रमांक 1 मधे 491, वॉर्ड क्रमांक 2 मधे 555, व वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 641 इतके मतदान झाले.

तर मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी 85 टक्के मतदान झाले असून 2459 मतदारांपैकी 2108 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये 409, वार्ड क्रमांक 2 मध्ये 578 वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 652 व वॉर्ड क्रमांक 4 मध्ये 469 इतके मतदान झाले असून सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. सकाळपासूनच दोन्ही गावांत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. बिरेवाडीत शेतकरी विकास मंडळ व जय बजरंगबली ग्रामविकास पॅनल तर मांडवे बु. मध्ये शेतकरी विकास मंडळ व ग्रामविकास मंडळ अशी लढत होती. आता मतदारांनी कौल कुणाला दिला याचा फैसला आज दि. 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार याचीच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान मतदान केंद्राबाहेर घारगाव स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सातपुते यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक राजू खेडकर, पोलिस नाईक किशोर लाड, पोलीस नाईक गोडे, पो. का. हरिश्चंद्र बांडे, पोलीस नाईक शेख, पो. कॉ. दांगड, हेड कॉन्स्टेबल दिवटे, पो. कॉ. कर्पे, पो. कॉ. आगलावे, हेड कॉन्स्टेबल भुतांबरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com