अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोनानंतर बर्ड फ्ल्यूची धास्ती नगरकरांना लागून असतानाच पाथर्डी तालुक्यात कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून

कलेक्टरांनी पाथर्डीतील मिडसांगवी दहा किलोमीटरचा परिसरा अलर्ट झोन डिक्लीअर केला आहे. या झोनमधून कोंबड्या, अंडी वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी तसे आदेश काढले आहेत.

कोरोनानंतर राज्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट येवू पाहत आहे. त्याचवेळी पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवीत 50 कोंबड्यांचा मृत्यू झाला. बर्ड फ्ल्यू सदृश्य रोगाने या कोंबड्या मृत झाल्याने पाथर्डी तालुका नियंत्रित क्षेत्र तर सांगवी आणि 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर अर्लट झोन जाहीर करण्यात आला आहे. या भागातील पोल्ट्री फार्म, परिसरातील कोंबड्यांच्या तपासणीची मोहीम जिल्हा परिषद व शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. एकूण कोंबड्या, मृत कोंबड्या याची माहिती संकलीत करण्याकरीता कालबध्द कार्यक्रम हाती घेण्यात यावा. सात दिवसांत त्याचा अहवाल कलेक्टर कार्यालयात सादर करावा असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत.

एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा पक्षी मृत आढळून आल्यास, मृत पक्षांच्या संपर्कात अन्य पक्षी वा प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आजारी पक्ष्यांचे विलगीकरण करावे, ते पक्षी इतरांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आजारी पक्ष्यांची वाहतूक अथवा विक्री करू नये असे आदेशात म्हटले आहे.