तोफखाना पोलिसांची बिंगो जुगारावर कारवाई

तरुण ताब्यात || सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त
तोफखाना पोलिसांची बिंगो जुगारावर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी उपनगरातील एकविरा चौकात सुरू असलेल्या बिंगो जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. अनिल गंगाधरराव शेजवळ (वय 26 रा. एकविरा चौक) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा एक लाख 12 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एक तरुण एकविरा चौक येथील मनपा बस स्थानकच्या पाठीमागे एका पत्र्याच्या आडोशाला बिंगो हारजीतीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन खेळतो व खेळवितो आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, संदीप धामणे, त्रिभुवन यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

या पथकाने मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता काळ्या रंगाची स्क्रिन लावलेली दिसली. आकडे लिहलेल्या चिठ्या घेवुन लोक स्क्रिनकडे पाहत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तेथील अनिल शेजवळ याला ताब्यात घेत त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी जप्त केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com