अहमदनगर|Ahmedagarमालट्रकला दुचाकी आडवी लावून तिघांनी ट्रक चालकाकडील रोख रक्कम व मोबाईल असा 12 हजार 200 रूपयांचा ऐवज लुटला. ही घटना.विळद बायपास येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.याप्रकरणी तिघा अज्ञात चोरट्यांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक सोनु लक्ष्मणलाल धाकड (वय- 22 रा. शिवपुरी ता. शहापुरा जि. भिलवाडा, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने चालले होते. ते विळद बायपास येथे आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी फिर्यादीच्या मालट्रकला दुचाकी अडवी लावली.ते तिघे फिर्यादीला म्हणाले, आम्ही फायनान्सवाले आहोत, तुमच्या ट्रकचा हप्ता थकला आहे. तुझ्या मालकाला फोन लाव. असे म्हणताच फिर्यादी यांनी त्यांची ट्रक रोडच्या बाजूला उभी केली. तिघेही ट्रकमध्ये चढले व दोघांनी फिर्यादी यांचा गळा दाबून धरला. तर एकाने फिर्यादी यांच्या खिशातील 11 हजार रूपये किंमतीचा मोबाईल, 1 हजार 200 रूपये रोख रक्कम, एटीएम कार्ड, पॅन कार्ड काढून घेतले. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहे.