दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात एक ठार

दुचाकी-ट्रॅक्टर अपघातात एक ठार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड- करमाळा रोडवरील झिक्री गावा जवळ लोकसेवा मंगल कार्यालय येथे दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाले असून त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

बाबु भोसले (रा. खांडवी, ता. जामखेड) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबू भोसले हे आपल्या खांडवी गावाहून जामखेडकडे येत असताना पुढे चाललेला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर लक्षात न आल्याने बाबू भोसले यांच्या मोटारसायकलची सदर ट्रॅक्टरला धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यांच्यावर जामखेड शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत बाबू भोसले हे खांडवी येथील रहिवासी तर अरणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अरण्येश्वर विद्यालयात शिपाई होते. त्यांच्या मृत्यूमुळे खांडवी व आरणगावावर शोककळा पसरली असून तालुक्यातील सर्व परिसरातील नागरिक विद्यार्थी मधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com