बेवारस दुचाकी मूळ मालकांच्या स्वाधीन

तोफखाना पोलिसांकडून कार्यवाही
बेवारस दुचाकी मूळ मालकांच्या स्वाधीन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडून असलेल्या दुचाकी शनिवारी मूळ मालकांना देण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, उपनिरीक्षक जरवाल, पोलीस अंमलदार शैलेश गोमसाळे, दत्तात्रय जपे, शकील सय्यद, जावेद शेख, श्रीनिवास देशमुख आदी उपस्थित होते. गुन्ह्यातील तसेच बेवारस स्थितीत आढळलेली सुमारे 100 वाहने तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवलेली होती.

ही वाहने त्यांच्या मूळ मालकांकडे स्वाधीन करण्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी 20 वाहन मूळ मालकांना देण्यात आली. तोफखाना पोलिसांकडून या वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात आला. यामधील सुमारे 64 वाहन मालकांचा पोलिसांना शोध लागला आहे. उर्वरित वाहने येत्या दोन दिवसांत मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com