पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

तालुक्यातील देसवडे गावानजीक बुधवारी (दि. 17) सायंकाळी गोविंद कानडे यांच्या मकाच्या शेतात चोरीची दुचाकी आणून

लपून बसलेल्या संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील चोरट्याला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला असून त्याचे इतर तीन साथीदार या घटनेनंतर फरार झाले आहेत. या साथीदारांची ओळख देसवडे ग्रामस्थांसह पोलिसांना पटली आहे. त्यामुळे सहा. फौजदार शिवाजी कडूस यांच्या फिर्यादीनुसार सध्या तरी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देसवडे गावातील ग्रामस्थांनी या मोटारसायकल व वीजपंप चोरीप्रकरणी पोपट नाथु भुतांबरे (रा. शिंदेवाडी तालुका संगमनेर) या चोराला ग्रामस्थांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. इतर तीन चोरांनाही तातडीने अटक करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संजीव भोर यांनी दिला आहे.

देसवडे व परिसरात मोटारसायकलसह इलेक्ट्रीक शेतीपंपाची चोरी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी जलदगतीने तपास करावा, अशी मागणी होत आहे. यासंबंधीची पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की देसवडे गावातील संतोष कानडे, पंढरीनाथ भोर, गेनभाऊ कानडे, सुनिल गुंड असे एकत्र जमल्यानंतर ती गाडी कोणाची आहे.

हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण तेथेच थांबून राहिलो. बुधवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी सदरची गाडी मक्याचे पिकातून मुख्य रस्त्यावर घेवून येवून गाडी चालू करत असताना आम्ही सर्वांनी त्यांना पकडले व त्यांना त्यांचे नावागावाची विचारणा केली असता पोपट नाथु भुतांबरे व पिंट दुधावडे असे सांगितले.

सदरचे गाडीबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता त्यांनी ही गाडी चोरीची असलेली सांगितले व ती गाडी आम्ही विकण्यासाठी येथे आलेलो असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांना फोन करा, असे म्हटल्यानंतर आमचे सोबत झटापटी केली.