सिव्हिलमधून दुचाकी चोरणारे दोघे पकडले

तोफखाना पोलिसांची कारवाई || दोन दुचाकी हस्तगत
 दुचाकी चोरी
दुचाकी चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील जिल्हा शासकीय रुग्णालय आवारातून दुचाकी चोरी करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांसह जिल्हा रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

नितीन उमेश कासार (वय 26 रा. कासरवाडी ता. पाथर्डी) व सचिन संजय मरकड (वय 21 रा. निवडुंगे ता. पाथर्डी) अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातून दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यासह तोफखाना हद्दीतून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील सिक्युरिटी गार्डला सापळा लावण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते.

दरम्यान रुग्णालय आवारात एक व्यक्ती त्याच्याकडील विविध चाव्या दुचाकीला लावून पाहत असताना त्याला रंगेहाथ पकडले. यानंतर दुसरा व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अटक केली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी, अंमलदारांनी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com