सराईत दुचाकीस्वारांच्या आवळल्या मुसक्या

2 लाखांच्या दुचाकी जप्त || पारनेर पोलिसांची कारवाई
सराईत दुचाकीस्वारांच्या आवळल्या मुसक्या

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर पोलिसांनी दुचाकी चोरांचा माग काढत सराईत दोन दुचाकीचोर तसेच दोन अल्पवयीन युवकांच्या मुस्क्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन लाखांच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

अर्जुन साहेबराव जाधव (23, रा. चिपाचीवाडी, चिंचाळे ता. राहुरी जि. अहमदगर)व नितीन सुनील काळे (19, रा. ठाकरवाडी, वनकुटे ता. पारनेर) यांच्यासह दोन अल्पवयीन युवकांना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यातील बागमळा, पळशी येथील बाळासाहेब बापू पठारे यांची मोटार सायकल चोरट्यांनी चोरली होती. याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पारनेर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित अर्जुन साहेबराव जाधव व इतर दोन अल्पवयीन हे स्थानिकांच्या मदतीने चोरलेल्या 3 मोटार सायकल खोलण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता अर्जुन जाधव याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नितीन सुनील काळे व साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली.

दरम्यान त्यांच्याकडून 2 लाख 3 हजार रुपयांच्या किमतीच्या आठ मोटारसायकल ताब्यात घेण्यात आले आहेत.ही कामगिरी पोलीस निरीक्षक घनशाम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई उगले, पोलीस अंमलदार पोहेकॉ संदीप गायकवाड, पो.ना. सुधीर खाडे, राम मोरे, गहिनाथ यादव, पो.कॉ.सुरज कदम, श्रीनाथ गवळी, विवेक दळवी, रवींद्र साठे, सचिन लोळगे यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com