
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव शहर पोलीस स्टेशनअंतर्गत शहर पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी करीत बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या . त्यांच्याकडून सुमारे 8 लाख 30 हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या 20 दुचाकींसह दोन आरोपींना रविवार दि.22 मे रोजी जेरबंद केले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली .
यावेळी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , दि. 19 मे रोजी फिर्यादी किशोर निवृत्ती दिघे (वय 29 वर्षे) धंदा नोकरी ( पोस्ट मास्तर ) रा . बेट संत जनार्धन आश्रम. ता . कोपरगाव यांची हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा .क्र . एम एच -15 सीयु 9 180 हि दि . 13 मे 2022 रोजीचे रात्री 0 9 : 30 वा . दरम्यान त्यांचे राहते घरा समोर हँडल लॉक करून लावली होती. ती दि . 14 मे रोजीचे सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने चोरून नेली होती.त्यावरून किशोर निवृत्ती दिघे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु .रजि नंबर 136 / 2022 भादंवि कलम 379 प्रमाणे दि.19 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे .
सदर गुन्हयातील तपास घेणेकामी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या अधिपत्याखाली पोहेकॉ आर. पी .पुंड , पो. कॉ. जे. पी. तमनर , पो. कॉ. संभाजी शिंदे , पो. कॉ .राम खारतोडे , पो. कॉ. जी . व्ही . काकडे अशांचे एक पथक तयार करून नाकाबंदी करीत असताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की , गोविंद संजय शिंदे रा . बेट कोपरगाव याचेकडे चोरीची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटार सायकल असून तो सध्या कोपरगाव ते शिर्डी जाणारे रोडवर बेट नाका कोपरगाव येथे थांबलेला आहे . अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मिळालेल्या महितीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता, मिळालेल्या माहितीप्रमाणे बेटनाका येथे एक इसम मिळून आला.
त्याचेकडील हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोसा क्र . एम. एच.-15 सीयु .9180 ही मोटार सायकल होती . तेव्हा सदर इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव गोविंद संजय शिंदे, रा . बेट कोपरगाव असे असल्याचे सांगून मोटार सायकल त्याचीच असल्याचे सांगितले .त्यास त्याचेकडेस असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस केली असता , त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे असलेल्या मोटार सायकल बाबत अधिकची विचारपूस केली असता ती मोटार सायकल त्याच्या मालकीची नसून ती कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं. 136 / 2022 क. 379 भादंवि मध्ये चोरी गेलेली मोटार सायकल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी आरोपी गोविंद संजय शिंदे, रा. बेट कोपरगाव यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्या ताब्यातील मोटार सायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने त्याचा मित्र अशीष राममिलन कोहरी, वय 20 वर्षे, रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव, मूळ रा. मंगोली, पोस्ट जगदीशपूर ता. मुसाफिरखाना, जि. अमेठी राज्य उत्तरप्रदेश व नाना पानसरे पूर्ण नाव माहीत नाही रा. कोपरगाव यांचे साथीने आम्ही सर्वांनी मिळून ठिकठिकाणाहून मोटार सायकल चोरी केलेल्या आहेत असे सांगितले.
तेव्हा त्याचा साथीदार अशीष राममिलन कोहरी वय 20 वर्षे रा . पुणतांबा चौफुली, कोपरगाव यास ताब्यात घेऊन त्याचेकडेस विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी ठिकठिकाणाहून मोटार सायकल, अॅक्टीव्हा स्कुटी, चोरी केलेल्या आहेत असे सांगून चोरी केलेल्या मोटार सायकल काढून दिल्या असून त्या सर्व 20 दुचाकी शहर पोलिसांनी जप्त करत आरोपी गोविंद संजय शिंदे, अशीष राममिलन कोहरी या दोन्ही गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांचा साथीदार नाना पानसरे पूर्ण नाव माहिती नाही हा फरार असून त्याचा शोध चालू आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर.पी.पुंड करीत आहेत. सदरची तपास कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोहेकॉ आर.पी.पुंड, पो. कॉ. जे .पी. तमण, कॉ संभाजी शिंदे, पो कॉ. राम खारतोडे, पो. कॉ. गणेश काकड, यांनी केलेली आहे.