मोटारसायकल चोरटा श्रीरामपुर येथून जेरबंद

सुपा पोलीसांची कामगिरी, अनेक गुन्हे होणार उघड
मोटारसायकल चोरटा श्रीरामपुर येथून जेरबंद

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा पोलिसांना चोरीच्या अनेक गुन्हात हवा आसलेल्या आरोपीला पोलिसांनी श्रीरामपुर येथुन पकडून आणले असुन त्याचाकडून चोरीच्या दोन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

संदीप जगन साठे (रा. वार्ड क्रमांक1, गोंदनी रोड,श्रीरामपुर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.साठे हा सुपा पोलिसांना चोरीच्या अनेक गुन्ह्यात हवा होता. संदीप साठेवर वहान चोरीचे अनेक गुन्हे आहे. खबर्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून सुपा पोलिसांनी त्यास श्रीरामपुर येथील रहात्या घरी अचानक छापा टाकत त्याच्या मुस्क्या आवळल्या.

संदीप साठे यास पडकले तेव्हा त्याच्या कडून दोन मोटारसायकली ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी एक मोटारसायकल आश्वी पोलिस स्टेशन हद्दीतुन व एक घुलेवाडी रोड संगमनेर येथुन चोरी केल्या आसल्याचे सांगितले. संदीप साठे याच्यावर सुपा पोलिस स्टेशन हद्दीत दुचाकी व चार चाकी वहाने चोरीचा आरोप आहेत. तसेच त्यावर अनेक पोलिस स्टेशनल विविध गुन्हे दाखल आहे. सुपा पोलिसांनी संदीप साठेला ताब्यात घेतल्याने अनेक गुन्हाची उकल होणार असल्याची शक्यता सुपा पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक कानगुडे तपास करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com