बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला

बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

बायकोला स्कूटी आवडली आणि त्याने ती चोरली, बायकोचे हट्ट पुरवायला गेलेल्या नवर्‍याला जेलची हवा खावी लागली.

बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला
जांभुळवाडी फाटा शिवारात कार उलटली

साकुरी येथील प्रमोद सुर्यभान पिंगळे यांची साई उपासनी हॉटल समोरुन सुझूकी कंपनीची अ‍ॅक्सेस स्कुटी (एमएच 17 बीयु 3978) ही पांढर्‍या रंगाची दुचाकी 8 ऑक्टोबर 2022 रोजी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशी फिर्याद त्यांनी राहाता पोलिस ठाण्यात दिली होती. राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला होता.

बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला
प्रत्येकाची आरोग्य कुंडली आता मोबाईलवर

पोलिस तपासात सागर संजय दिलवाले मुळ रा. माळी घोगरगाव ता. वैजापूर हल्ली राहाणार कराळवाडी ता. राहुरी हा पिंगळे यांच्या हॉटेल नजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणुन करोनाच्या काळात काम करत होता. त्याने ही स्कूटी चोरल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा शोध कराळवाडी ता. राहुरी येथे घेवून त्याला ताब्यात घेतले. त्याला राहाता न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

बायकोचा हट्ट पुरवायला गेला, अन जेलात जावुन बसला
कोपरगाव तहसील कार्यालयातील जनता दरबारात तक्रारींचा पाऊस

बायकोला स्कूटी हवी असल्याने आपण चोरी केल्याचे त्याने कबुल केल्याची व चोरलेली गाडीही काढून दिल्याची माहिती राहाता पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरक्षक सुनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. बी. आवारे व हेड काँन्स्टेबल दिलीप तुपे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com