शहर, उपनगरांतून तीन दुचाकींची चोरी

शहर, उपनगरांतून तीन दुचाकींची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली हद्दीतून दोन तर एमआयडीसी हद्दीतून एक अशा तीन दुचाकींची चोरी झाली आहे. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मार्केड यार्ड येथील गाळा नंबर 30 समोरून नानासाहेब पांडुरंग खेडकर (रा. सारसनगर) यांची दुचाकी (एमएच 16 एएल 4549) चोरीला गेली.

खेडकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी चोरीची दुसरी घटना केडगाव उपनगरात पंचम वाईन्ससमोर घडली. संतोष शिवाजी झावरे (रा. भोसले आखाडा) यांची दुचाकी (एमएच 16 डीबी 0275) चोरीला गेली. झावरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोल्हेगाव फाटा येथील अपार्टमेंटमधून गोरख भगवान हांडे यांची दुचाकी चोरीला गेली. हांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com