दोन दिवसांत चार दुचाकींची चोरी

दोन दिवसांत चार दुचाकींची चोरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर, उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना थांबायला तयार नाहीत. गेल्या दोन दिवसांत चार दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. दरम्यान दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नगरकर हैराण झाले आहेत. दुचाकी चोरीच्या टोळ्या शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.

प्रमोद केशरमल गुगळे (वय 52) यांची दुचाकी (एमएच 16 एपी 7943) ते राहत असलेल्या घराचे समोरून चोरीला गेली. दुचाकीचे हॅन्डल लॉक होते. तरीही चोरट्यांनी गुगळे यांची दुचाकी लंपास केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मार्केटयार्ड येथील सफल फायनान्स शेजारी उभी केलेली सचिन रामदास गिरी (वय 33 रा. मोहोज बुद्रुक ता. पाथर्डी) यांची दुचाकी (एमएच 16 बीएक्स 4173) चोरीला गेली.

गिरी यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. भिंगार येथील महात्मा फुले नागरी पतसंस्थेसमोर उभी केलेली महेश विठ्ठल रंगोटे (वय 50 रा. माधवबाग, अलमगीर, भिंगार) यांची दुचाकी (एमएच 16 बीपी 8410) चोरीला गेली. त्यांनी भिंगार कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली आहे. चौपाटी कारंजा येथील निखिल पराग चौकार (वय 29) यांची दुचाकी (एमएच 16 बीजे 7019) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. त्यांनी तोफखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com