दुचाकीला कारची धडक; एक ठार

- ब्राम्हणी येथील घटना
दुचाकीला कारची धडक; एक ठार

उंबरे |वार्ताहर|Umbare

राहुरी शनिशिंगणापूर रोडवर (Rahuri Shanishinganapur Road) ब्राह्मणी (Bramhani) येथील पेट्रोलपंपासमोर मोटारसायकलला पाठीमागून येऊन स्विफ्ट गाडीने धडक दिल्यामुळे ब्राह्मणी येथील विठ्ठल शहाराम गायकवाड हे मयत (Death) झाले आहे.

दुचाकीला कारची धडक; एक ठार
तनपुरे मटकावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक

याबाबत माहिती अशी की राहुरी-शिंगणापूर रोडवर (Rahuri Shanishinganapur Road) पेट्रोल पंपशेजारी विठ्ठल गायकवाड हे आपल्या दुचाकीवर पेट्रोल पंपावर (Petrol Pump) पेट्रोल भरण्यासाठी चालले असताना पाठीमागून येणार्‍या चारचाकी वाहनाने भरधाव वेगात येऊन गायकवाड यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) मयत गायकवाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी वाहनाने नगर येथे रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीला कारची धडक; एक ठार
शेतकर्‍याच्या खात्यावरील 35 हजार रुपये केले गायब

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) अपघाताची खबर देण्यात आली. मयत गायकवाड यांच्या डोक्याला मार लागून ते रस्त्यावर गंभीर जखमी (Injured) अवस्थेत पडलेले होते. दरम्यान पाठीमागून धडक देऊन चार चाकी वरील वाहन चालक वाहन सोडून पसार झाला.

दुचाकीला कारची धडक; एक ठार
कोपरगाव शहरालगत कंटेनर व ट्रकची समोरासमोर धडक

या अपघाताची फिर्याद नवनाथ बाबासाहेब गायकवाड राहणार ब्राह्मणी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी चारचाकी वाहनाच्या अज्ञात वाहन चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

दुचाकीला कारची धडक; एक ठार
आलिशान चारचाकी वाहनातून 28 किलो गांजा जप्त

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com