मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू

मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

श्रीरामपूर (Shrirampur) नेवासा (Newasa) राज्य महामार्गावर वडाळा महादेव (Vadala Mahadev) गावाजवळ मंगळवारी सकाळी दुचाकीच्या झालेल्या अपघातात (Bike Accident) नेवासा तालुक्यातील पाचेगाव (Pachegav) (कारवाडी) येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू
उड्डाणपूलावरून पडून युवकाचा मृत्यू

याबाबत माहिती अशी की, नेवासा (Newasa) तालुक्यातील पाचेगाव (कारवाडी) येथील तरुण द्रोणाचार्य दत्तात्रय तुवर (वय 28) हा कोपरगाव (Kopargav) येथे नोकरीस आहे. तो मंगळवारी सकाळी मोटारसायकलवरुन (एमएच 17 सी 7142) कोपरगावकडे जात होता. पावणेसातच्या सुमारास तो नेवासा श्रीरामपूर रोडवरील (Newasa Shrirampur Road) वडाळामहादेव जवळ त्याचा अपघात (Accident) झाला. स्थानिकांनी अपघातात जखमी झालेल्या द्रोणाचार्य तुवर याला साखर कामगार रुग्णालयात हलविले.

मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू
डोक्यात खोरे घालून केला भावाचा खून

मात्र डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी लोणी (Loni) येथील प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत (Death) घोषित केले. अपघाताचे कारण नेमके समजू शकले नाही. मात्र मोटारसायकल झाडावर धडकली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू
आ. तनपुरे, आ. जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के, लेटर पॅड

मागील महिन्यातच (मार्च) त्याचे लग्न झाले होते. कोपरगाव (Kopargav) येथील कारखान्यात तो नोकरीस होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन बहीणी, चुलते, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. अशोक कारखान्याचे कर्मचारी दत्तात्रय तुवर यांचा तो मुलगा तर अशोक कारखान्याचे माजी संचालक दिगंबर तुवर यांचा पुतण्या होता. द्रोणाचार्यच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दुपारी अडीच वाजता त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोटारसायकल अपघातात पाचेगावच्या तरुणाचा मृत्यू
सासुरवाडीच्या मंडळींनी जावयाला केली मारहाण
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com