दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी

दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर (Shrirampur) परिसरातील नेवासा रोडवरील (Newasa Road) हॉटेल गझलसमोर दुचाकीस्वारांचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात एक जण ठार (Death) तर अन्य दोघे जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान हा अपघात (Accident) झाला.

दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी
कोपरगावात दोन दुकानदारांची लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

यामध्ये दुचाकीवर श्रीरामपूर (Shrirampur) येथील सरस्वती कॉलनीतील स्वयंवर मंगल कार्यालयाशेजारी असलेले राजेंद्र मारुती बोरुडे यांचा व कोपरगाव तालुक्यातील (Kopargav) धोत्रे भोजडे येथील गणेश भाऊसाहेब पिंपळे व यांच्यासोबत असलेल्या यमुनाबाई पुंजाहारी मुळे (रा. नेवासा रोड, नाक्यासमोर, श्रीरामपूर) यांच्यात हा अपघात (Accident) झाला. अपघातात राजेंद्र बोरुडे (वय 52) यांच्या डोक्याला गंभीर (Injured) मार लागल्याने त्यांना नागरिकांनी तात्काळ औषध उपचारासाठी येथील कामगार रुग्णालयात हलविले. परंतू वैद्यकीय उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू (Death) झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.

दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी
नगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींवर प्रशासक

मयत राजेंद्र मारुती बोरुडे यांच्याकडे प्लेटिना क्र. एम. एच. 17 सीके 8105 या क्रमांकाचे तर जखमी गणेश भाऊसाहेब पिंपळे यांच्याकडे सीडी डीलक्स क्र. एम. एच. 17 सीके 7717 या क्रमांकाचे दुचाकी वाहन होते. अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले. अपघातात गणेश भाऊसाहेब पिंपळे (वय 35) व यमुनाबाई पुंजाहारी मुळे (वय 65) हे जखमी झाले असून यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती नागरिकांनी शहर पोलीस ठाणे यांना कळविली. त्यावरून पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक अमोल गायकवाड, पोलिस नाईक किरण पवार, यांनी घटनास्थळी भेट देत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त व्यक्तींना नागरिकांच्या मदतीने येथील साखर कामगार रुग्णालय येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

दुचाकीस्वारांच्या भीषण अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी
700 प्रवासी क्षमता असणार्‍या रेल्वेत दररोज अवघे चार प्रवासी

अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com