दुचाकी डिव्हायडरला जावून आदळल्याने तरूणीचा मृत्यू

दुचाकी डिव्हायडरला जावून आदळल्याने  तरूणीचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती डिव्हायडरला जावून आदळल्याने झालेल्या अपघातात पोलीस कर्मचार्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

कोमल यशोदास पाटोळे (वय 18 रा. नागापूर, नगर) असे मृत मुलीचे नाव आहे. नगर- मनमाड रोडवरील हुंडेकरी लॉन्ससमोर शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

कोमल दुचाकीवर नगर- मनमाड रोडने नागापूरकडून नगरच्या दिशेने येत असताना हुंडेकरी लॉन्स समोर तिचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी डिव्हायडरला जावून आदळली. यात कोमलच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यशोदास पाटोळे यांची ती मुलगी होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com