महसूल मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी सायकल रॅली

पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात निदर्शने
महसूल मंत्री थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी सायकल रॅली
मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर (प्रतिनिधी)-

भाजप सरकारने (BJP Govt) केलेली भरमसाठ पेट्रोल-डिझेल, गॅसची दरवाढ (Petrol Disel and Gas price Hike) आणि वाढलेली महागाई या विरोधात जिल्हा काँग्रेस (Ahmednagar Congress) कमिटी व फ्रंटलच्या वतीने तालुक्यात सर्व ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत सोमवार (दि. 12) सकाळी 11 वाजता शहरात सायकल रॅली (cycle rally) आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके (Balasaheb Salunke) यांनी दिली आहे

याबाबत अधिक माहिती देताना साळुंके म्हणाले, जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात येत्या आठवडाभर सर्व तालुक्यांमध्ये निदर्शने करण्यात येणार आहेत. यामध्ये केंद्र सरकार विरोधात भाव वाढीच्या निषेधार्थ प्रत्येक तालुक्यात सायकल रॅली, महिलांच्या वतीने गॅस वाढी विरोधात आंदोलन, शेतकर्‍यांचे आंदोलन, युवक काँग्रेसचे आंदोलन याचबरोबर सरकार विरोधात सह्यांची मोहीम असे विविध निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्‍यांची ऑनलाईन बैठक झाली. यामध्ये आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राज्य सरचिटणीस उत्कर्षा रूपवते, कार्याध्यक्ष सचिन गुजर यांसह सर्व तालुक्यातील तालुकाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला .

याप्रसंगी आ. डॉ. तांबे म्हणाले, केंद्र सरकारने मनमानी धोरण सुरू केले आहे. हे सरकार पूर्णपणे शेतकरी कामगार सर्वसामान्यांच्या विरोधी धोरण घेत असून या धोरणाचा निषेध करण्यासाठी आपण जनजागरण मोहीम आयोजित केली आहे. गावपातळीपर्यंत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून केंद्र सरकारच्या जुलमी धोरणाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवावा. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढ होत नव्हती मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या बॅरल च्या किमती अत्यंत कमी असतानाही मोदी सरकारने मात्र पेट्रोल डिझेल दरवाढ करून भरमसाठ लूट सुरु ठेवली आहे या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रत्येकाने सज्ज व्हावे असे आवाहन केले.

आ. कानडे म्हणाले, मोदी सरकारने फक्त भांडवलदारांना साठी कायदे व नियम बनवणे सुरू केले आहे. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. केंद्र सरकारमध्ये नवीन मंत्री आले म्हणून सर्वसामान्यांना कोणताही फरक पडणार नसून त्यांच्या जीवनात फरक पडावा यासाठी काँग्रेसच काम करत असून ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करण्यासाठी करावे.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले, येत्या आठवडाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी महसूल मंत्री थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे व काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शहरात भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष साळुंके यांनी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com