दोनदा भूमिपूजन होऊनही निळवंडे कालव्यांचे काम बंदच

दोनदा भूमिपूजन होऊनही निळवंडे कालव्यांचे काम बंदच
File Photo

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या निळवंडेच्या प्रलबीत अंत्य कालव्यांचे गेल्या महिन्यात दोनदा भूमिपूजन झाले मात्र अद्याप या कामाला सुरवात झालेली नसल्याने लाभधारकांमधुन संताप व्यक्त होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील पाच तालुक्यामधील जिरायती भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाचे काम पुर्ण झाले आहे मात्र कालव्यांअभावी लाभक्षेत्राला कायमच दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. कालव्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद झालेली आहे. जलसंपदा विभागाने पिंपरी निर्मळजवळ सुरु होणार्‍या निळवंडेच्या शुन्य ते पंधरा किलोमीटरच्या अंत्य कालव्यासाठी जवळपास साडेबारा कोटीचे टेंडर जळगावच्या एमएस कंस्ट्रक्शन कंपनीला निश्चीत केले आहे.

आ. सदाशिव लोखंडे व निळवंडे कृती समिती सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या कालव्याच्या भूमीपुजनही झाले.लॉकडाऊनचे उल्लघन झाले म्हणून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. मात्र याला महीना उलटुन गेला तरी प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. भूमिपूजनाच्या वेळी असलेली यंत्रसामुग्रीही गायब झाली आहे.त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांमध्ये संभ्रम तयार झाला असून नेमक काम बंद पडण्यामागील भूमिका व वस्तुस्थिती काय? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com