केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण

अहमदनगर | प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या अनेक कामांना मंजूरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामांनाही सुरूवात होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. डॉ. सुजय विखे, खा. सदाशिव लोखंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, आ. संग्राम जगताप, अंकूश काकडे, राजश्री घुले, आ.निलेश लंके, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, राम शिंदे, आ.लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, राजेंद्र क्षीरसागर, एस पी मनोज पाटील उपस्थित होते.

Related Stories

No stories found.