‘भुईकोट’च्या विकासासाठी समिती नेमा !

जिल्हाधिकारी, आमदारांना हरियाली संस्थेची सूचना
‘भुईकोट’च्या विकासासाठी समिती नेमा !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भुईकोट किल्ल्याच्या (Bhuikot Forts) पर्यटन विकासासाठी संरक्षण विभागाचे अधिकारी (Defense Department officials for tourism development0 , शासकीय अधिकारी तसेच या संबधित लोकप्रतिनिधी, नागरीक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांची एक समन्वय समिती स्थापन करा अशी सूचना हरियाली संस्थेने (Hariyali Institutions) जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) व आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने निधी दिला आहे. किल्ल्याच्या विकासासंदर्भात नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानूसार हरियाली संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी भोसले व आमदार जगताप यांची भेट घेवून सूचनांचे निवेदन देण्यात आले. यावेळी हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, तुलसीराम पालीवाल, ठाकुरदास परदेशी,पंकज मेहेर,योगेश गायकवाड, दिपक परदेशी, निलेश मिसाळ,संदिप पावसे,विष्णु नेटके, अ‍ॅड.आजीज इनामदार, महेंद्र रामदिन, मयुर ढापसे, मयुर कळवे, संजय राहुरकर, रमेश घुले आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, किल्ल्याच्या मागील बाजुस, लकडीपुल रस्त्यालगत नगर क्लबच्या समोरच्या मोठ्या मोकळ्या जागेत नक्षत्र वन व मरोज गार्डन निर्माण करुन त्यात आधुनिक ओपन जिमम निर्माण करावी, किल्ल्याच्या आतील बाजुस मुख्य गेटच्या डाव्या बाजुच्या जागेत आकर्षक असे अ) औषधि वनस्पती उद्यान ब) वनस्पती उद्यान निर्माण करुन तेथे कारंजे, लेजर शोचीही निर्मिती करावी जेणेकरुन औषधी वनस्पतीचा पर्यटकांना परिचय होईल व पर्यटनाचा आनंदही घेता येईल, दोन वर्षापुर्वी खंदकाभोवतीची खचुन पडलेली मोठी भिंत दुरुस्त करावी, संपुर्ण जागिंग ट्रँकच्या दोन्ही बाजुस स्वयंचलीत सौर दिवे लावण्यात यावे, किल्ल्या भोवतीचे तार कंपाऊंडचे नुतनीकरण करुन मजबुत करण्यात यावे, झुलता पुल दुरुस्त करुन पुर्वी सारखा निर्माण करावा,

हे सर्व कामे कायमस्वरुपी सुरु राहण्याठी समन्वय आणी सुसंवाद साधण्यासाठी संरक्षण विभागाचे अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच या संबधित लोकप्रतिनिधी, नागरीक, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधि यांची एक समन्वय समिती स्थापन करणे आवश्यक आहे, किल्ल्याच्या बाजुस असलेल्या तार कंपाऊंडच्या बाहेर रस्त्याच्या बाजुने असलेल्या वेड्या बाभळी मुळासहीत काढुन टाकण्यात याव्यात जेणेकरुन त्या बाभळीच्या बिया आतील भागात असलेल्या जॉगींग ट्रँकवर पडुन पुन्हा ट्रँकवर उगवणार नाही, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मनेता कक्ष परीसरात निजामशाहीचा इतिहास व स्वातंत्र्य लढ्यात किल्ल्यात बंदिवान असलेल्या नेत्यांचे कार्यकतृत्व चित्ररुपाने भव्य भिंत उभारुन चित्रित करण्यात यावा, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाचीही सोय करण्यात यावी, करोनामुळे बंद असलेला जॉगिंग ट्रँक पुन्हा सुरु करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com