‘भुईकोट’ला राष्ट्रीय स्मारक घोषित करा

भिंगार राष्ट्रवादीचे पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन
‘भुईकोट’ला राष्ट्रीय स्मारक घोषित करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार छावणी (Bhingar Camp) हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या (Union Ministry of Defense) ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे (Beautification of Bhuikot fort) बंद असलेले काम पुन्हा सुरु करावे तसेच या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक (National monument to the historic fort) म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Bhingar NCP) पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (Minister of State for Tourism Aditi Tatkare) यांना देण्यात आले.

पर्यटन राज्यमंत्री तटकरे (Minister of State for Tourism Aditi Tatkare) या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर (tour of Ahmednagar district) आल्या असता त्यांची भेट घेऊन भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी त्यांना सदर मागणीचे (Demand) निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अभिजित सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, दीपक बडदे, प्रांजली सपकाळ आदी उपस्थित होते.

छावणी परिषदेच्या हद्दीत ऐतिहासिक भुईकोट किल्ला (Bhuikot fort)असून या किल्ल्यात भारताचे पहिले पंतप्रधान (India's first Prime Minister) बंदिवासात असताना त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ ( Discovery of India) लिहिला. तसेच या किल्ल्यात मौलाना आझाद (Maulana Azad) यांसारखे आनखी स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुष बंदिवान होते. त्यांचे बंदीवान गृह देखील अस्तित्वात आहे. हा किल्ला भव्य असून, त्याचे सुशोभीकरण करुन राष्ट्रीय स्मारक घोषित झाल्यास पर्यटन क्षेत्राला चालना मिळून भिंगार शहराचा विकास (Development of Bhingar city) साधला जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com