भोरवाडी, साकत शिवारात हातभट्टीचे रसायन पकडले

नगर तालुका पोलिसांची कारवाई; तिघांविरूध्द गुन्हे
भोरवाडी, साकत शिवारात हातभट्टीचे रसायन पकडले

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) देशी-विदेशी दारूसह (Domestic-Foreign Liquor) हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे (Raids on Liquor Dens) टाकले. नगर तालुक्यातील साकत (Sakat), भोरवाडी (Bhorwadi) शिवारात बुधवारी ही कारवाई केली. 60 हजार रूपये किंमतीचे एक हजार लीटर हातभट्टी तयार करण्यासाठी वापरणारे रसायन व 960 रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू जप्त (Domestic and Foreign Liquor Confiscated) केली आहे.

या प्रकरणी तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) तीन स्वतंत्र गुन्हे दाखल (Crime Filed) करण्यात आले आहेत. आकाश महिपती पवार (रा. साकत), सुभाष भाऊसाहेब वाघ (वय 32 रा. भोरवाडी) व राजु मैला पवार (रा. साकत) अशी दारू विक्री करणार्‍या आरोपींची नावे आहेत. भोरवाडी, साकत शिवारात अवैधरित्या देशी-विदेशी दारू व गावठी हातभट्टी दारू (Gavthi Alcohol) तयार करून विक्री केली जात असल्याची माहिती सहायक निरीक्षक राजेंद्र सानप (Assistant Inspector Rajendra Sanap) यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार योगेश ठाणगे, ज्ञानेश्‍वर खिळे, गांगर्डे आदींच्या पथकाने बुधवारी भोरवाडी (Bhorwadi) व साकत (Sakat) शिवारात छापे (Raid) टाकले. यावेळी देशी-विदेशी दारू, कच्चे रसायन असा सुमारे 61 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल (Upper Superintendent Saurabh Agarwal), पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com