भोकरच्या तरुणाचा गंगापूर येथे अपघाती मृत्यू
भोकर |वार्ताहर| Bhokar
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रहिवाशी व अशोक कारखाण्याचे हंगामी कामगार संदिप सावळेराम शिंदे ( वय 35) यांचा गंगापूर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला, हि बातमी भोकर येथे पोहचताच गावात शोककळा पसरली, त्यांचेवर आज दि.22 जुन रोजी दुपारी भोकर येथे अंत्यसंस्कार होत आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्यात हंगामी कामगार म्हणुन काम असलेला संदिप शिंदे हा एक आठवड्यापूर्वी गंगापूर येथे सासरवाडीला राहण्यासाठी गेला होता. तेथुन काल भोकर येथून मुलीचा शाळेचा दाखला घेवुन पुन्हा गंगापुरकडे जात असताना गंगापुर अमरधाम जवळील रोडवर काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मोटार सायकल ला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्याचेवर आज गुरुवार दि.22 जुन रोजी दुपारी भोकर येथे अंत्यसंस्कार होत आहे. त्याचे पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. येथील सावळेराम शिंदे यांचा तो मुलगा होय तसेच येथील संजय व मारुती सावळेराम शिंदे यांचा भाऊ तसेच अशोक कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माणीक शिंदे यांचा तो पुतण्या होय.