भोकर येथे विहिरीत पडून तरूणीचा मृत्यू

भोकर येथे विहिरीत पडून तरूणीचा मृत्यू

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील एका शेतकरी कुटूंबातील तरूणीचा विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 23) दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह विहीरीतून काढण्यात यश आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भोकर शिवारातील वडजाई परीसरात शेतात राहत असलेले संदिप सावळेराम जगदाळे यांची मुलगी पुजा संदिप जगदाळे (वय 16) ही महाविद्यालयीन तरूणी शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरापासून काही अंतरावर असलेल्या गट नं.184 मधील विजय इंद्रभान जगदाळे यांच्या विहीरीत पडल्याने तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना जगदाळे कुटूंबियांच्या लक्षात येताच त्यांनी आरेडा करून तीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतू दुपारची वेळ असल्याने वेळेत मदत उपलब्ध झाली नाही.

घटना समजताच काही वेळाने मोठा जनसमुदाय जमा झाला होता. काहींनी टाकळीभान येथील पट्टीचे पोहणारे रावसाहेब बनकर यांना पाचारण केले. परंतू विहीरीत जास्त पाणी असल्याने त्यांचे प्रयत्न विफल ठरत होते. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यास यश आले. या कामी बनकर यांना जवळच राहत असलेले शेतकरी युवक चांगदेव पटारे, अजीत मते यांनी मदत केली. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह काढण्यात यश आले.

श्रीरामपूर तालुका पोलीसांत येथील मच्छींद्र कारभारी जाधव यांनी खबर दिली. या प्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यू र नं.27/2021, सीआरपीसी 174 प्रमाणे घटनेची नोंद करण्यात आली आहे. काल सायंकाळी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. पुजा ही संदिप जगदाळे यांची एकुलती एक मुलगी होती. ती अशोक पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर डिप्लोमाचा कोर्स करत होती. तीचे पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, एक भाऊ असा परीवार आहे.

या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि. मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. रवींद्र पवार हे पुढील तपास करत आहेत. या वेळी पो. हे. काँ. रवींद्र पवार, पोलीस मित्र बाबा सय्यद, पोलीस पाटील बाबासाहेब साळवे, संतोष मते, सोसायटीचे संचालक नानासाहेब जगदाळे, भानुदास बेरड, राजेंद्र सलालकर, डॉ. राहुल सलालकर, वैभव सलालकर व अमृत सलालकर आदिंसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com