भोकर येथे तुलसी विवाहाने काकड आरतीची सांगता

दोन वर्षांच्या विरहानंतर वारंकर्‍यांनी महिनाभर लुटला काकड आरतीचा आनंद
भोकर येथे तुलसी विवाहाने काकड आरतीची सांगता

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील वारकरी, भजनी मंडळ व नागरिकांसाठी सर्वात मोठा असलेला उत्सव म्हणजेच काकडा आरतीची नुकतीच तुलसी विवाहाने सांगता झाली. यावेळी नागरिकांनी या सोहळ्याचा चांगलाच आनंद लुटत मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. दोन वर्षाच्या खंडानंतर संपन्न झालेल्या या सार्वजनिक तुळसी विवाह सोहळ्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत होते.

गेल्या अनेक वर्षांची वारकरी सांप्रदायाची ही आध्यात्मीक सेवा परपंरा गेल्या दोन वर्षापासून सुरू झालेल्या करोनाच्या आक्रमणामुळे खंडीत झाली होती परंतू सध्या सर्वत्र करोना कमी झाल्याचे दिसत असल्याने शिथील झालेल्या बंधनाचा फायदा घेत भोकर येथील वारकरी व भजनी मंडळांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत आश्वीन महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू झालेला काकडा आरतीने पहाटे चार वाजेपासूनच सर्वत्र आसमंत दुमदुमत होते. दोन वर्षांच्या विरहानंतर सुरू झालेल्या काकड आरतीचा वारकर्‍यांसह भजनी मंडळाने काकड आरतीचा आनंद लुटला. हनुमान मंदिर व संत सावता महाराज मंदिर येथे काकडा आरती सुरू होती. संत सावता महाराज मंदिर येथे निवृत्ती महाराज विधाटे व हनुमान मंदिर येथे भागवतराव पटारे महाराज यांचे मार्गदर्शनाखाली काकड आरती उत्सव संपन्न झाला.

हनुमान मंदिर येथे सुरू असलेल्या काकड आरती दरम्यान येथील वारकर्‍यांनी गाववर्गणीतून गावातील हनुमान मंदिरासमोरील तुलसी वृंदावनासह श्री क्षेत्र हनुमान मंदिराचे रंगकाम करण्यात आले, येथील कलीम व सलीम शेख यांनी सुरेख रंगकाम केले. या दरम्यान अनेक भाविकांनी काकड आरतीस सहभागी झालेल्यांना चहा व नाष्ट्याची सेवा उपलब्ध करून दिली जात होती. तसेच कार्तीक पौर्णिमेच्या सकाळच्या ब्रम्हमुहूर्तावर गोपाल कृष्ण आणी तुळशीमातेचा सार्वजनिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी रेणुका हर्बलचे संचालक मच्छिंद्र पटारे यांनी महाप्रसादाचे अन्नदान केले. या विवाहाचे पौराहित्य योगेश दंडवते यांनी केले.

या सोहळ्यात निवृत्ती महाराज विधाटे, भागवतराव पटारे महाराज, आण्णासाहेब चौधरी, रामदास शिंदे, आण्णासाहेब वाकडे, नामदेव तागड, ज्ञानेश्वर काळे, मच्छिंद्र खंडागळे, अशोक शिंदे, बाळासाहेब उगले, जगन्नाथ चव्हाण, गोरख चव्हाण, ठकचंद तागड, मच्छिंद्र काळे, भानुदास वाकडे, अशोक वाकडे, जालिंधर पंडीत, मच्छिंद्र बनकर, कान्हु आहेर, राम न्हावले, श्याम न्हावले, कैलास न्हावले, संजय लोखंडे, माधव आबुज, विठ्ठल आबुज, अशोक मते, बाबासाहेब चतुर, जगन्नाथ दारूंटे, साहेबराव पांढरे, चांगदेव राहिंज, भानुदास अभंग, श्रीधर खेत्री, मोहन पांढरे, पोपट वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com