दारू पिऊन दहशत करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा

बैठकीत ठराव || तालुका पोलिसांच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष
दारू पिऊन दहशत करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करा

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील भोकर (Bhokar) येथील दारू पिऊन ( Alcohol Drink) गावात दहशत निर्माण करणारे व भुरट्या चोरांचा (Thife) बंदोबस्त करण्याची मागणी भोकर ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे तालुका पोलिसांना केली असून ग्रामपंचायतीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या मासिक बैठकीत ठराव (meeting Resolution) बहुमताने संमत करून त्यानुसार तालुका पोलिसांना (Police) कळविले असल्याने आता तालुका पोलीस काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

भोकर (Bhokar) गावात काहीजण दारू पिऊन (Alcohol Drink) सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात दहशत निर्माण करतात व शिवीगाळ करत फिरतात. तसेच गावातील वाड्यावस्त्यांवरील शेतकर्‍यांच्या विहिरीवरील वीजपंप चोरी, केबल स्टार्टर, घरगुती पाण्याचा वीजपंप व मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भुरट्या चोरांचा व दारू पिऊन गावात दहशत (village Panic) निर्माण करणार्‍या दारूड्यांचा बंदोबस्त करावा. तसेच गावात पोलीस कर्मचार्‍यांची गस्त वाढविण्याची मागणी नुकतीच ग्रामपंचायतीच्या(Grampanchayat) मासिक ठरावात करण्यात आली व त्यानुसार ठराव बहुमताने संमत करून त्या ठरावाची प्रत नुकतीच तालुका पोलिसांना दिली आहे. या ठरावाचे सूचक राजेंद्र चौधरी हे आहेत तर त्यास सोसायटीचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे.

या बैठकीस (Meeting) असलेले उपसरपंच महेश पटारे, सागर शिंदे, राजेंद्र चौधरी, राधाकिसन विधाटे, सुभाष डूकरे, इंदूबाई रूपटक्के, मिनाक्षी चव्हाण, इंदूबाई आहेर, जयश्री छल्लारे, लता अमोलीक आदींच्या सह्यांसह ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचा ठराव नुकताच तालुका पोलिसांना (Police) दिला आहे. आता तालुका पोलिसांकडून होणार्‍या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com