भोकर सोसायटी अध्यक्षपदी माजी आ. मुरकुटे गटाचे विधाटे

उपाध्यक्षपदी ससाणे गटाचे किशोर छल्लारे बिनविरोध
भोकर सोसायटी अध्यक्षपदी माजी आ. मुरकुटे गटाचे विधाटे

भोकर |वार्ताहर| Bhokar

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब रावसाहेब विधाटे यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रदेश महासचिव करण ससाणे व आ. लहु कानडे गटाचे किशोर उर्फ गणेश भारत छल्लारे यांची बिनविरोध निवड झाली.

भोकर विविध कार्यकारी सोसायटी संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी माजी आ. भानुदास मुरकुटे, आ. लहु कानडे व करण ससाणे गटाने केलेल्या युतीतून स्थापन झालेल्या जगदंबा विकास मंडळ विरूद्ध आ. लहु कानडे व माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकूटे गटाच्या जगदंबा परीवर्तन मंडळ अशी लढत सरळ लढत झाली. या निवडणुकीत जगदंबा विकास मंडळाने सर्व जागांवर विजय मिळवत आपली सत्ता अबाधीत राखली तर विरोधी जगदंबा परीवर्तनचा दारूण पराभव झाल्याने मतदारांना परीवर्तन मान्य नसल्याचे दिसले.

या सोसायटीत सहाय्यक निबंधक संदिपकुमार रूद्राक्ष यांनी बोलविलेल्या बैठकीत नवडी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षपदासाठी दोन व उपाध्यक्षपदासाठी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज घेतले परंतू निर्धारीत वेळेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एक-एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी श्री. रूद्राक्ष यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषीत केले.

बाळासाहेब रावसाहेब विधाटे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून अण्णासाहेब काळे तर अनुमोदक बाबासाहेब तागड आहेत तर उपाध्यक्षपदासाठी किशोर भारत छल्लारे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून महेश पटारे तर अनुमोदक सागर शिंदे हे आहेत. संचालक मंडळ निवडणुकीत बाळासाहेब विधाटे हे सर्वाधिक म्हणजे 342 मतांच्या फरकाने विजयी झालेले एकमेव व ज्येष्ठ संचालक आहेत तर सर्वसाधारण मतदार संघात नारायण पटारे हे प्रथम क्रमांकाची मते मिळवत विजयी झालेले असल्याने प्रथम अध्यक्षपदाचे मानकरी यातूनच ठरणार असल्याची चर्चा सुरू असताना बाळासाहेब विधाटे हे सर्वाधिक फरकाने विजयी झालेले असल्याने व ज्येष्ठ असल्याने त्यांना प्रथम अध्यक्षपदाचा सन्मान देण्यात आल्याचे जाणकारांनी सांगितले.

मी राजकारणात आल्यापासून माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचेशी एकनिष्ठ राहिल्याने मला हि संधी मिळाली असल्याचे अध्यक्ष बाळासाहेब विधाटे यांनी सांगीतले तर मी ही गेल्या अनेक पंचवार्षीक पासून माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे यांचेबरोबर नंतर करण ससाणेंसोबतच असल्याने मला संघटनेने हि संधी दिली, असे किशोर छल्लारे यांनी सांगितले.

या बैठकीस अण्णासाहेब काळे, नारायण पटारे, कारभारी तागड, दत्तात्रय पटारे, महेश पटारे, सागर शिंदे, किशोर छल्लारे, याकोब अमोलीक, सुमन मते, सिताबाई जगदाळे, बाळासाहेब विधाटे व बाबासाहेब तागड आदी संचालक उपस्थित होते. तसेच भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, पंढरीनाथ मते, नामदेव तागड, शाळा व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश अमोलीक, नानासाहेब जगदाळे, धनगर समाज संघर्ष समीतीचे तालुकाध्यक्ष राजीव तागड, प्रहारचे दीपक पटारे, राहुल अभंग, भारत छल्लारे, सूर्यभान शेळके, रविंद्र विधाटे, रविंद्र मते, सुनील विधाटे, मोहन पांढरे, विकास भोईटे, बाळासाहेब काळे, गोरख विधाटे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब देवकर, भारत विधाटे, गोरख अमोलीक, गोरक्षनाथ आबुज, अरविंद धनेश्वर व श्री.ढाले आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.